जुनी छत्री दुरुस्तीपेक्षा नवीन खरेदीला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी छत्री दुरुस्तीपेक्षा नवीन खरेदीला पसंती
जुनी छत्री दुरुस्तीपेक्षा नवीन खरेदीला पसंती

जुनी छत्री दुरुस्तीपेक्षा नवीन खरेदीला पसंती

sakal_logo
By

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : पाऊस सुरू झाला की छत्री खरेदी व दुरुस्ती हे दरवर्षी ठरलेले असते. मात्र सध्या अनेकांना नवनवीन छत्र्या खरेदी करण्याचा मोह आवरला जात नाही. त्यामुळे कोणीही जुनी छत्री दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे दारोदारी छत्र्या दुरुस्ती करणाऱ्यांना कामे मिळत नसल्याने त्यांनीही रोजगाराचे माध्यम बदलले आहे. फक्त दोन महिने छत्र्या दुरुस्तीची कामे हाताला लागतात. त्यात दोन वर्षे अनेकजण घराबाहेर न पडल्याने छत्र्या दुरुस्ती करणाऱ्यांचा व्यवसायच संपुष्टात आला आहे.

राज्यात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि नवनव्या डिझाईनच्या छत्र्या विकायला येतात. त्यामुळे जुनी झालेली छत्री पुन्हा दुरुस्त करून वापरण्यापेक्षा नवीन छत्रीचा मोह लोकांना आवरता येत नाही. त्यात दरवर्षी बाजारात विविध रंगांच्या व आकर्षित करणाऱ्या छत्र्या येतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरतील अशा छत्र्या बाजारात दाखल होतात. बाजारातून लोखंडी तारांच्या छत्र्या जवळजवळ नामशेष झाल्या असून आता सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याने या कारागिरांकडे ग्राहक फिरकत नाहीत. तसेच रेनकोट, जॅकेट्समुळे छत्री वापरणे कमी झाले आहेत. यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने या छत्री दुरुस्त करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

‘वापरा आणि फेकून द्या’ला पसंती
मागील आठवडाभरापासून सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपले. आठ महिने अडगळीत ठेवलेली छत्री पाऊस सुरू झाला की आपोआपच बाहेर येते. बाजारात चिनी बनावटीच्या स्वस्त ‘वापरा आणि टाकून द्या’ छत्र्या मिळत असल्याने दुरुस्ती करण्याकडे लोक जास्त लक्ष देत नाहीत. यामुळे छत्र्या दुरुस्त करणाऱ्या कारागिरांची संख्या खूप कमी झालेली पाहायला मिळत आहे.

स्वस्त छत्र्यांचा पर्याय उपलब्ध
बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि नवनव्या डिझानच्या छत्र्या १०० रुपयांपासून विकायला असतात. कारागिरांनी दुरुस्तीसाठी लागणारे दरही वाढवले आहेत. त्यामुळे आणखी पैसे खर्च केले तर नवीन छत्री येईल, असा विचार नागरिकांकडून केला जातो.

कोरोनापूर्वी चार महिने आमचा धंदा खूप तेजीत असायचा, पण गेल्या दोन वर्षांपासून धंदा खूप कमी झाला आहे. त्यामुळे दिवसाला शंभर ते दीडशेच रुपये हाती लागतात. कधी कधी रिकाम्या हाती परतावे लागते.
- मोहन भूज, कारागीर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87661 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..