उमेश कोल्हे यांच्या हत्येच्‍या निषेधार्थ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश कोल्हे यांच्या हत्येच्‍या निषेधार्थ आंदोलन
उमेश कोल्हे यांच्या हत्येच्‍या निषेधार्थ आंदोलन

उमेश कोल्हे यांच्या हत्येच्‍या निषेधार्थ आंदोलन

sakal_logo
By

बदलापूर, ता. ३ : देशभरातच नव्हे तर, जगभरात गाजणाऱ्या नूपुर शर्मा प्रकरणात समर्थन करणारी पोस्ट टाकणाऱ्या अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बदलापूर शहरात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत या हत्येचा निषेध व्यक्त केला.

नूपुर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेकडे कोणीही गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल अविनाश मोरे यांनी विचारला आहे. उमेश कोल्हे यांच्यासारख्या नागरिकाची हत्या म्हणजे संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची भावना यावेळी मोरे यांनी व्यक्त केली. जर या घटनेची दखल घेऊन या संदर्भात कडक पाऊले उचलली गेली नाहीत तर यापुढे सोशल मीडियावर लोक व्यक्त होताना घाबरतील. सोशल मीडियासारखे माध्यम आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहे. अशा ठिकाणी व्यक्त होऊन असा भयंकर मृत्यू मिळणार असेल तर लोक आपल्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मुकतील, अशी भीती सुद्धा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87662 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..