व्हॅल्युएबल एडयुटेन्मेंटला प्रतिष्ठेचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॅल्युएबल एडयुटेन्मेंटला प्रतिष्ठेचा पुरस्कार
व्हॅल्युएबल एडयुटेन्मेंटला प्रतिष्ठेचा पुरस्कार

व्हॅल्युएबल एडयुटेन्मेंटला प्रतिष्ठेचा पुरस्कार

sakal_logo
By

मुंबई : ‘व्हॅल्युएबल एज्युटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड (व्हीईपीएल) ने मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन एज्युकेशन समीट २०२२’ मध्ये ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह टेक्नोलॉजी सोल्युशन्स’साठी प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. या परिषदेचे आयोजन ‘ग्लोबल ट्रीएम्फ फाऊंडेशन’ या जागतिक स्तरावरील आघाडीच्या अॅनालिटिकल कंपनीने केले होते. ही कंपनी जगातील आघाडीच्या कंपन्या आणि उद्योगांना मानांकन, संशोधन आणि अंतर्ज्ञान यांच्यावर आधारित विपणन संशोधन (मार्केटिंग रिसर्च) सेवा पुरविते. या सोहळ्याचे आयोजन हॉलिडे इन हॉटेलमध्ये करण्यात आले होते. ‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर वक्ते म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेसाठी काय करायला हवे आणि कोणती पावले उचलायला हवीत, यावर मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये स्वरूप संपत रावल सहभागी झाल्‍या होत्‍या. त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये जीवन कौशल्य प्रशिक्षण देणे कसे गरजेचे आहे, यावर आपले विचार मांडले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘व्हीईपीएल’च्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत जी कामगिरी बजावली आहे, त्याबाबत प्रशंसोद्गार काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87668 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..