चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक संतप्त
चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक संतप्त

चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक संतप्त

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील कासा गावात जाणारे सर्व रस्ते पहिल्याच पावसाने खड्डेग्रस्‍त व चिखलमय झाले आहेत. यावरून वाहने चालविणे तर दूरच, पण पायी चालणेदेखील जिकिरीचे होत आहे. यामुळे नागरिकांमध्‍ये संताप व्‍यक्‍त होत आहे. डहाणू–नाशिक राज्य मार्गावर कासा हे मोठे गाव आहे. मुख्य रस्त्यावरून कासा गावात जाणारे प्रमुख सर्व रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडले आहेत; तसेच हे रस्‍ते चिखलमय झाले आहेत. या रस्त्यांवर सध्‍या नेहमीच अपघात होत आहेत. दुचाकीवरून पडून अनेक जण गंभीर जखमीदेखील झाले आहेत.

बंद पथदिवे व जलवाहिनीच्‍या कामामुळे समस्‍येत भर
ग्रामपंचायतीचे पथदिवे वीजबिल थकल्याने अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्री रस्त्यावर अंधार असतो. अशा वेळी शाळकरी मुले, रुग्ण, महिला, वृद्ध यांना रात्रीचा प्रवास करणे खूप कठीण होत आहे. त्यातच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूस जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील समस्येत भर पडली आहे.

प्रशासकीय राजवटीमुळे गोंधळ
गेल्या वर्षभरात सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुका झाल्या नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक चालवीत आहे. त्यामुळे या समस्‍यांकडे लक्ष दिले जात नसल्‍याचे स्‍थानिकांचे मत आहे. प्रशासनाने या समस्‍या लवकर मार्गी लावाव्‍यात, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87681 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..