बंदी झुगारून पर्यटक पांडवकड्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदी झुगारून पर्यटक पांडवकड्यावर
बंदी झुगारून पर्यटक पांडवकड्यावर

बंदी झुगारून पर्यटक पांडवकड्यावर

sakal_logo
By

खारघर, ता. ३ (बातमीदार) : पांडवकडा धबधब्यावर होणाऱ्‍‌या दुर्घटना टाळण्यासाठी खारघर पोलिसांनी धबधबा परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र रविवारी बंदी झुगारत शेकडो पर्यटकांनी धबधब्यात मनसोक्‍त भिजण्याचा आनंद घेतला.
पांडवकडा धबधब्यावर गेल्या दहा वर्षांत अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे टाळण्यासाठी खारघर पोलिसांनी ७ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत धबधबा परिसरात प्रवेश बंदी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे फलकही पांडवकडा प्रवेशद्वार, तसेच ड्रायव्हिंग रेंज, तळोजा जेलसमोरील तलाव आणि ओवेकॅम्प गावाशेजारी फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही रविवारी बंदी झुगारून शेकडो पर्यटक पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आले होते. या वेळी काही तरुणांनी जीव धोक्यात घालून ओढ्यातून दुचाकीवरून पांडवकडा धबधबा गाठला.
दरवर्षी पांडवकडा धबधब्याचा प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त असतो, मात्र खारघर पोलिसांनी यंदा दंडात्मक कारवाईचे फलक लावले आहेत, मात्र बंदोबस्‍त नसल्‍याने दिवसभर पर्यटक येत होते. धबधब्याचा आनंद घेताना दहा वर्षांत १५ हून अधिक तरुणांचा बळी गेला आहे. याविषयी खारघर पोलिस ठाण्यात संपर्क केल्‍यानंतर त्‍यांनी धबधबा परिसराकडे धाव घेतली.

गतवर्षी १०० पर्यटकांची सुटका
गतवर्षी जुलै महिन्यात वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक खारघर सेक्टर ५ मधील धबधब्‍यावर दाखल झाले होते. या वेळी काही कुटुंबासह लहान मुलेही उपस्थित होती. दरम्यान, खारघर डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहू लागल्यामुळे ७८ महिला, ५ मुले आणि २० पुरुष अडकून पडले होते. या वेळी खारघर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी खारघर अग्निशमन केंद्राला माहिती दिली. अग्निशमन जवानांनी दुथडी भरून जाणाऱ्या नाल्यावर पन्नास फूट लांब शिडी आणि दोरखंड बांधून सर्व पर्यटकांची सुटका केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87688 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..