मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी
मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी

मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेने पहिल्या तिमाहीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत २१.६२ दशलक्ष टनांची मालवाहतूक केली आहे. याशिवाय जून २०२२ महिन्यात ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक करून मध्य रेल्वेने नवा विक्रम नोंदवला आहे. २०२१-२२ च्या मागील सर्वोत्तम पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू वर्षात मालवाहतुकीत १६.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने सर्वोत्तम कामगिरी करत जून २०२२ मध्ये ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये ५.९७ दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. त्या तुलनेत यावर्षी जून २०२२ महिन्यातील मालवाहतुकीत २०.४४ टाक्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे, तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत १८.५४ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली गेली. त्यात १६.६१ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील मालवाहतूक ही कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक आहे.
---
- मुंबईत कोळशाचे ३० रेक लोड
- नागपूर विभागात कोळशाचे ९०१ रेक लोड
- बल्लारशाह येथून लोहखनिजाचे ६४ रेक लोड
- ऑटोमोबाईल्सचे ६८ रेक लोड
- अन्नधान्याचे २५ रेक लोड
- साखरेचे १०१ रेक लोड
जिप्समचे ३ रेक
- फ्लाय ॲशचे ५ रेक
-----
कोट-
विभागांवर आणि मुख्यालयात सखोल विपणन, अंमलबजावणीसाठी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सची (बीडीयू) स्थापना आणि जलद वाहतुकीसाठी कोचमध्ये बदल करण्यासारख्या उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेने ही कामगिरी केली आहे.
- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87689 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..