मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : सत्तांतराच्या १३ दिवसांच्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी ठाण्यात येणार आहेत. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. दुपारी आनंदनगर चेकनाका येथे सर्व समर्थक जमणार असून या वेळी मोठे शक्तिप्रदर्शनही करण्याचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी ठाणेकरांनी कधीही न पाहिले असे जंगी स्वागत करण्याचा निर्धार माजी महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आला आहे. शिवसेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले आहे. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली असून ठाण्यातील ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागतही तेवढेच भव्यदिव्य व्हावे, यासाठी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आनंदमठात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्वागताच्या बॅनरपासून ते शक्तिप्रदर्शनाची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली.
सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात स्वगृही परतणार आहेत. दुपारी ३ वाजता त्यांच्या गाड्यांचा ताफा आनंदनगर चेकनाका येथे पोहचणार आहे. तेथेच शिंदे यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर खोपट मार्गे शक्तिस्थळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तेथून टेंभी नाका येथील आनंद मठात कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87716 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..