दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

प्रयोगशील शेतकरी लक्ष्मीप्रसाद पाटील यांचा सन्मान
वसई (बातमीदार) ः तालुका कृषी विभाग व पंचायत समितीतर्फे विविध प्रयोग करणारे वसईच्या आडणे गावातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मीप्रसाद पाटील यांचा सन्मान करण्यात आला. विविध पद्धतीचा अवलंब करत शेतीतून उत्पन्न व उत्पादन कसे मिळेल, याकडे त्यांचा कल असतो, याची दखल शासनाकडून घेण्यात आली. हा सन्मान सोहळा पारोळ ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश उबरसडा, अशोक पाटील, वसई पंचायत समिती सभापती गीता पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते. लक्ष्मीप्रसाद पाटील यांनी शेत जमिनीत पट्टा पद्धत, हिरवळीचे खत, सेंद्रीय शेती, यांत्रिकीकरण, मोगरा, फळबाग लागवड, डाळ मिल असे अनेक प्रयोग केले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेतर्फे कृषी दिन
पालघर (बातमीदार) ः अनुभवसंपन्न शेतकरी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीमध्ये प्रगती करू शकतो आणि आपल्या समाजाची व देशाची प्रगती करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी केले. पालघर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे नुकताच कृषी दिन व प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्‍या बोलत होत्‍या. पालघर जिल्ह्यात स्ट्रॉबेरी, चिकू, मोगरा तसेच अनेक वेगवेगळ्या प्रयोगातून वेगळी पिके फळे निर्माण होऊ शकतात. तरुणांनी जास्तीत जास्त शेतीत उतरून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास करावा, असे आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.

वोन्ना माणिमाला आणि गजानन धुळे यांचा सत्कार समारंभ
विरार (बातमीदार) ः विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील वोन्ना माणिमाला आणि गजानन धुळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. २० वर्षांच्या सेवेनंतर माणिमाला मॅडम; तर ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गजानन धुळे निवृत्त झाले आहेत. वसई–विरार महापालिकेच्या माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, समन्वयक नारायण कुट्टी, कल्पना राऊत, विवा पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेंद्र अडिगल, उपप्राचार्या प्रा. प्राजक्ता परांजपे, मुख्याध्यापिका चारुता चुरी, उपमुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्नीम मर्चंट, आत्मजा कासट आणि प्रीतिजा कुडू आणि आभारप्रदर्शन आत्मजा कासट यांनी केले.

आचार्य भिसे गुरुजी यांची पुण्यतिथी
बोर्डी (बातमीदार) ः शंकर रामचंद्र ऊर्फ आचार्य भिसे गुरुजींची चाळिसावी पुण्यतिथी व आचार्य भिसे शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन झाई बोरीगाव येथील वनरावन काकूबाई लाखानी माध्यमिक विद्यालयाच्या श्रीमती इंदुताई जनार्दन राऊत सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. के. पाटील; तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई वांद्रे येथील अध्यायन संस्थेचे संचालक राजीव वर्तक उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आदिवासी व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे राजीव वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87727 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..