‘टिलर’ ठरत आहे शेतकऱ्यांची पावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टिलर’ ठरत आहे शेतकऱ्यांची पावर
‘टिलर’ ठरत आहे शेतकऱ्यांची पावर

‘टिलर’ ठरत आहे शेतकऱ्यांची पावर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) ः पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात शेतीच्‍या कामांना वेग येतो. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्याचा घुमणारा आवाज, असेच चित्र पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतात नांगर ओढणाऱ्या बैलांची जोडी दिसायची. मात्र आता ही बैलांची जोडी जाऊन त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापरत असल्‍याचे दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यांमध्‍ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात; परंतु बदलत्या काळानुसार व कृषी विभागाचा आधुनिक शेती प्रचार व अत्याधुनिक अवजारांच्‍या विविध योजनांचा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी ‘हायटेक’ बनू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा व अंगमेहनत वाचू लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रयत्न करू लागले आहेत.

कृषी विभागाकडून पॉवर टिलरला अनुदान
कृषी विभागाकडून शेतकऱ्‍‌यांसाठी पॉवर टिलरसाठी व इतर कृषी साहित्यासाठी विविध योजना आहेत. तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदी साठी ५० टक्‍के अनुदान असून महिला बचत गटासाठी विशेष सवलत आहे. त्यामुळेच विक्रमगड व ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉवर टिलरची खरेदी केली आहे.

टिलरचा उपयोग
टिलरचा उपयोग नांगरणी, चिखलणी, भाजीपाला लागवडीसाठी होतो. बैलाद्वारे नांगरणीचे काम दोन दिवसांत होत असेल, तर तेच काम पॉवर टिलर चार ते पाच तासांत करते. त्यामुळे अंगमेहनत, वेळेची बचत व पैशाची बचत होते. त्याचप्रमाणे पॉवर टिलरने नांगरणी केल्यास जमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते. चिखळणीही चांगली होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87729 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top