सिडको वसाहतीतील सदनिकांमध्ये गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको वसाहतीतील सदनिकांमध्ये गळती
सिडको वसाहतीतील सदनिकांमध्ये गळती

सिडको वसाहतीतील सदनिकांमध्ये गळती

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. ४ (बातमीदार) : सर्वसामान्य नागरिकांसाठी सिडकोने नवी मुंबईत विविध ठिकाणी परवडणारी घरे बांधली, मात्र या घरांमध्ये आता गळती होऊ लागली आहे. ज्या विकसकाला काम दिले आहे, त्या विकसकाच्या कामाबद्दल शंका उपस्थित होत आहे. सिडको प्रशासनाकडेही तक्रार करून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

घणसोली येथे सेक्टर दहामध्ये सिडकोने १५ इमारतींचे मेघमल्हार संकुल उभारले आहे. या संकुलामध्ये राहण्यास आलेल्या रहिवाशांना सदनिकांमध्ये पावसाच्या पाण्याच्या गळतीचा सामना करावा लागत आहे. या गळतीमुळे घरामध्ये शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. या संकुलात सिडकोने आश्वासनाव्यतिरिक्त रहिवाशांना काहीच दिले नाही. विविध ठिकाणाहून राहण्यास आलेले येथील रहिवासी अद्याप स्थानिक मतदार नसल्याने लोकप्रतिनिधीही समस्यांकडे लक्ष देत नाही, असे सांगण्यात आले.

संकुलातील अनेक साहित्य चोरीला
या संकुलामध्ये फायरचे नोझल व इतर यंत्रणा चोरीस गेल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नवीन फायर नोझल आणले; मात्र तेही चोरीला गेले. सदनिकांची गळती, पार्किंगची समस्या, कंपोस्ट खत प्रकल्प आधी समस्यांना गांभीर्याने पाहिले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांकडून ठोस कृती नाही
गळतीबाबत तक्रार केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून सिमेंट लावून कारागीर जातात. कारागीर गेल्यानंतर पुन्हा गळती सुरू होते. याबाबत सिडकोची वरिष्ठ अधिकारी व या संकुलाचे देखभाल करणारे अभियंता अविनाश पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करूनदेखील काहीच कृती होत नसल्याने रहिवासी आक्रमक झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87736 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top