
बेलपाडा भुयारी मार्गात पाणी
खारघर, ता. ४ (बातमीदार) : खारघर रेल्वे स्थानकाशेजारील बेलपाडा भुयारी मार्गात पाणी साचत आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत आहे.
खारघर परिसरातील प्रवासी, तसेच रिक्षाचालकांना खारघर रेल्वेस्थानकावर ये-जा करण्यासाठी सिडकोने सायन-पनवेल महामार्गावरील बेलपाडा गावाजवळ भुयारी मार्ग उभारले आहे. भुयारी मार्गात दुहेरी मार्गिकेची सोय करण्यात आली आहे. मात्र स्थानकावरून बेलपाडा वसाहतमार्गे बाहेर पडणाऱ्या भुयारी मार्गाच्या एका मार्गिकेत पावसाचे पाणी तुडुंब भरत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे स्थानकावर जाणाऱ्या आणि बाहेर पडणारी वाहने एकाच मार्गिकेचा उपयोग करीत असल्यामुळे दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सिडकोने पाणी निचरा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र ठेकेदार योग्य रीतीने काम करीत नसल्यामुळे अशी अवस्था निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या विषयी कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87744 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..