दृष्‍टीक्षेपृ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेपृ
दृष्‍टीक्षेपृ

दृष्‍टीक्षेपृ

sakal_logo
By

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्‍या विभागीय सचिवपदी विशाल वालोद्रा
मालाड (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार, तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई विभागीय सचिव पदाची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ता विशाल वालोद्रा यांना देण्यात आली आहे. मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष वकील नीलेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ही नियुक्‍ती करण्यात आली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष गटनेता/नगरसेविका राखी जाधव यांच्या हस्ते विशाल यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि पालक सत्कार सोहळा
शिवडी (बातमीदार) ः शिवडी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक २०४ च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि पालक सत्कार सोहळा परळ पूर्व येथील महर्षी दयानंद कॉलेज येथे पार पडला. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांनी सहभाग नोंदवला. यावेळी माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दहावी परीक्षेला बसून उत्तीर्ण झालेले आई, बाबा आणि मुलगा यांचा माजी आमदार दगडू सपकाळ व विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यांची नावे दिनेश पांचाळ, वैशाली पांचाळ आणि हिमेश पांचाळ अशी आहेत.

घाटकोपर मनविसे विभाग अध्यक्षपदी समीर सावंत
घाटकोपर (बातमीदार) ः आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून विद्यार्थी सेनेत नव्याने पद नियुक्ती जाहीर केल्या आहेत. घाटकोपर पश्चिमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विभाग अध्यक्षपदी समीर नंदकुमार सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल, उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थांच्या विविध समस्या आंदोलनात समीर सावंत यांचा सहभाग आहे. कोरोना महामारीत सावंत याने विद्यार्थांच्या शाळेच्या वाढीव फीबाबत आंदोलन केले आहे.

शिवसेना युवासेना सहसचिवपदी परशुराम तपासे
चेंबूर (बातमीदार) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी
विद्यार्थी नेते परशुराम तपासे यांची युवासेना सहसचिवपदी नियुक्ती केली आहे. परशुराम तपासे यांनी आतापर्यंत विद्यार्थी संघटनेत मोलाचे काम केले आहे. कित्येक आंदोलन व गरीब गरजू विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. त्यांचे कार्य पाहून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांची सहसचिवपदी नियुक्ती केली आहे.

मनविसे घाटकोपर (प.) विभाग सचिवपदी ॲड. अभिषेक सावंत
घाटकोपर (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या आदेशाने घाटकोपर पश्चिम विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग सचिवपदी ॲड. अभिषेक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिममधील प्रभाग क्रमांक १३२, १३३ आणि १३४ या तीन प्रभागांसाठी त्यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी ॲड. अभिषेक सावंत यांनी वेळोवेळी आंदोलने उभारली आहेत. सावंत यांना विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल, उपविभाग अध्यक्ष संदेश मोरे, मनविसे राज्य उपाध्यक्ष प्रमोद मांढरे, मनविसे विभाग अध्यक्ष समीर सावंत यांनी नव्या नियुक्तीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87750 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top