१२ ते १४ वयोगटातील लसीकरणात नाशिक आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२ ते १४ वयोगटातील 
लसीकरणात नाशिक आघाडीवर
१२ ते १४ वयोगटातील लसीकरणात नाशिक आघाडीवर

१२ ते १४ वयोगटातील लसीकरणात नाशिक आघाडीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : कोविडविरोधातील लढा तीव्र करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध वयोगटांतील लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या १२ ते १४ वयोगटातील लसीकरणात नाशिक जिल्हा आघाडीवर असून मुंबईत सर्वांत पिछाडीवर आहे. एकूण लसीकरणाच्या कार्यक्रमात मुंबईची कामगिरी उत्कृष्ट राहिली असताना; मात्र लहान मुलांच्या लसीकरणात मुंबई मागे पडली आहे.
१२ ते १४ वर्षे वयोगटातील राज्यातील पहिल्या डोसचे प्रमाण सरासरी ६२ टक्के; तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. सुमारे ९० टक्के मुलांचे लसीकरण करून नाशिक जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जालना ८६ टक्के आणि सांगली ८५ टक्के क्रमांक लागतो. या वयोगटातील मुंबईतील एकूण ३.९५ लाख लाभार्थ्यांपैकी केवळ ३५ टक्के मुलांना पहिला डोस मिळाला आहे. पुण्यातही १२-१४ वयोगटातील केवळ ५५ टक्के मुलांनाच लशीचा पहिला डोस मिळाला आहे.
---
दोन्ही डोसमध्ये नांदेड पिछाडीवर
१२ ते १४ वयोगटातील दोन्ही डोसबाबतही नाशिक आघाडीवर असून तिथे जवळपास ६२ टक्के लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ सांगलीत ५९ टक्के मुलांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत; तर दोन्ही डोस पूर्ण करण्यात नांदेड सर्वांत मागे असून मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईत केवळ १८ टक्के मुलांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87762 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top