प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी
प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

sakal_logo
By

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : शहरातील नागरिकांना मूलभूत तसेच पायाभूत सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्‍नशील आहे. त्‍याअंतर्गत महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभीकरण व नवीन पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यास व कळंबोली येथे प्रभाग कार्यालयाची उभारणी करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासकीय सेवेसाठी कार, जीप, इनोव्हा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका व इलेक्ट्रिक (कार/जीप) वाहने वाहनचालकासह तीन वर्षे कालावधीकरिता भाडेतत्त्वावर पुरवण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली.
पडघे गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, समाज मंदिराच्या बांधकामासह खारघर गावात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. आगामी निवडणूक कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रमांकरिता लागणारे मंडप, खुर्च्या, बॅरेकॅटिंग व इतर निविदा पत्रकात नमूद केलेले साहित्य पुरवण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली.
मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. या वेळी स्थायी समिती सदस्य, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहायक आयुक्त वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक नीलेश नलावडे, सचिव विनायक बारशे आदी उपस्थित होते.

वृक्ष नोंदणीकरिता निविदेला स्थायी समितीची मंजुरी
पनवेल, ता. ४ (प्रतिनिधी) ः महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याकरिता पालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान पालिकेला प्राप्त झालेल्या निविदांपैकी न्यूनतम दराच्या निविदेस सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्‍यामुळे लवकरच पालिका क्षेत्रातील वृक्षांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87765 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..