वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

sakal_logo
By

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्यू
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबईत दुचाकीवरून पनवेल येथे घरी परतणाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात जखमी व्यक्‍तीचा उपचारांदरम्‍यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथे घडली. सानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव सुनील अकुल प्रसाद (३५) असून तो पनवेल येथे राहतो. त्‍याचे खांदा कॉलनीत टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. रविवारी पहाटे २.१५ च्या सुमारास सुनील नवी मुंबईतून पनवेलला घरी जात होता. ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथे पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. यात सुनील प्रसाद गंभीर जखमी होऊन खाली पडला. एका रिक्षाचालकाने त्याला नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्‍णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87781 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top