मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य
मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य

मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरीही रस्त्यांवरील परिस्थिती मात्र यंदाही वेगळी नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांच्या तक्रारीमुळे वाहतूक मंदावल्याचे चित्र सबंध मुंबईभर आहे. विशेषतः पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या मोठी आहे. मुंबई महापालिकेने जूनअखेरपर्यंत ५,२४९ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे.
मुंबई महापालिकेची विभागवार यंत्रणा आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून हे खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहतूक व्यवस्थेची दैना झाली आहे. महापालिकेची विभागवार यंत्रणाही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला लागली आहे. खड्डे बुजवतानाच रस्त्यावरील खराब झालेले पट्टेही महापालिकेकडून प्राधान्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या अस्फाल्ट प्लांटच्या माध्यमातून आगाऊ पोहोच झालेल्या कोल्डमिक्सच्या खडीचा फायदा हा तात्काळ खड्डे बुजवण्यासाठी होत आहे. मुंबई महापालिकेने उच्चभ्रू वस्त्या तसेच सरकारी कार्यालये असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेत खड्डे भरून काढण्याबरोबरच काही ठिकाणी पॅचेसही भरून काढले आहेत.
मुंबई शहरात तसेच उपनगरांत पडणाऱ्या खड्ड्याच्या तक्रारींबाबत मुंबई महापालिकेला विविध यंत्रणांच्या माध्यमातून तसेच हेल्पलाईन, पॉटहोल ॲपच्या माध्यमातूनही तक्रारी येत आहेत. तसेच अनेकदा मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडूनही या खड्ड्यांबाबतची माहिती यंत्रणेकडे येत आहे. या तक्रारींवर काम करतानाच पालिकेची विभागवार यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी पालिकेने आपल्या विभागवार रस्ते अभियंत्यांची यादीही जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे.
...
पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक
यंदाच्या पावसाळ्यासाठी रोड रोडलरचा वापर खड्डे बुजवल्यानंतर करण्यात येतो आहे. मुंबई शहरासह मुंबई पूर्व उपनगरात एम ईस्ट म्हणजे मानखुर्द, गोवंडी परिसरात मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने खड्डे बुजवले आहेत. पश्चिम उपनगरात सर्वाधिक खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः वांद्रे, खार, अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड या परिसरात खड्ड्यांची मोठी संख्या आढळून आली आहे. या ठिकाणी महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. एकूण ८,२११ चौरस मीटरचे रस्ते हे खड्डे बुजवण्याच्या माध्यमातून महापालिकेने भरून काढले आहेत.
...
वॉर्ड खड्डे
अ २६५
ब ३०८
एफ दक्षिण ३९७
के पूर्व ५४४
के पश्चिम ५७७
पी उत्तर ५७५
पी दक्षिण ४४१
एम पूर्व ५०७
आर सेंट्रल
...
सर्वाधिक काम दक्षिण मुंबईत
मुंबई महापालिकेने रस्त्यावरील पॅचेसही काही ठिकाणी भरून काढले आहेत. त्यामध्ये कंत्राटदाराकडून हे पॅचेस तसेच खड्डे बुजवण्याचे सर्वाधिक काम हे दक्षिण मुंबईत अ वॉर्डात सर्वाधिक असे झाले आहे. या ठिकाणी ३५ पॅचेस आणि खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबईतील श्रीमंत तसेच सरकारी कार्यालये असणाऱ्या भागात महापालिकेने विशेष अशी काळजी यंदा घेतली आहे.
...
एक हजार चौरस किलोमीटर...
वांद्रे भागातही पालिकेने विशेष काळजी घेत १२ ठिकाणी खड्डे आणि पॅचेस भरून काढले आहेत. मानखुर्द, गोवंडी भागातही काही ठिकाणी पॅचेस आणि खड्डे हे कंत्राटदाराकडून भरून काढण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पॅचेस असलेल्या भागात कंत्राटदाराने विशेष काळजी घेत हे खड्डे भरून काढले आहेत. एकूण एक हजार चौरस किलोमीटरचे रस्ते हे मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून भरून
काढण्यात आले आहेत.
...
पश्चिम उपनगरालाच कोल्डमिक्सचा सर्वाधिक पुरवठा
महापालिका डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करते. हे कोल्डमिक्सचे म्हणजे डांबर आणि खडीचे मिश्रण होय. ते वरळी येथील प्लाण्टमध्ये तयार होते. सर्वाधिक कोल्डमिक्सच्या बॅगा या पश्चिम उपनगरामध्ये पुरवण्यात आल्या. एकूण ९४ हजार ३२३ कोल्डमिक्सच्या बॅगांतून २,३५८ मेट्रिक टन कोल्डमिक्स यंदा महापालिकेने शहर आणि उपनगरांतील वॉर्डना पुरवले. त्यामध्ये सर्वाधिक कोल्डमिक्सचे वाटप हे पश्चिम उपनगरामध्ये के पूर्व, के पश्चिम, पी उत्तर, पी दक्षिण या भागासाठी म्हणजे विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली आणि मालाड या भागासाठी झाले आहे. या भागातच सर्वाधिक अशा खड्ड्यांची समस्या आढळून आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87783 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..