मनसेतर्फे विद्यार्थांना वह्या वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेतर्फे विद्यार्थांना वह्या वितरण
मनसेतर्फे विद्यार्थांना वह्या वितरण

मनसेतर्फे विद्यार्थांना वह्या वितरण

sakal_logo
By

मनसेतर्फे विद्यार्थांना वह्या वाटप

घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घाटकोपरमध्ये मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १३३ मध्ये उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगम आणि प्रभाग १३४ मध्ये महिला सदस्या विजया गीते, शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या वतीने विभागातील विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. चौथी ते आठवीमधील विद्यार्थांना मनसे सरचिटणीस शिरीष सावंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल, महिला विभाग अध्यक्ष संगीता हुले, मनविसे विभाग अध्यक्ष समीर सावंत, शाखाध्यक्ष प्रवीण बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

मोफत दंत व नेत्र चिकित्सा शिबिर
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः मालवणीतील रमझान अली शाळा, वाणी शाहू आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मालवणीत अस्मिता ज्योती कॉम्प्लेक्स येथे मोफत दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मालवणी गेट क्रमांक सहा येथे आयोजित या शिबिराचे उद्‌घाटन माजी नगरसेविका कमर जहाँ सिद्दिकी, तसेच हैदर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शंभरहून अधिक व्यक्तींनी याचा लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळे व प्रशांत मोहिते यांनी आयोजनात आपले योगदान दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87799 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..