नवी मुंबई पावसाची दमदार हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई पावसाची दमदार हजेरी
नवी मुंबई पावसाची दमदार हजेरी

नवी मुंबई पावसाची दमदार हजेरी

sakal_logo
By

वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. नवी मुंबई शहरात सोमवारी दिवसभरामध्ये ३८.३१ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून हजेरी लावून मध्येच गायब होणाऱ्या पावसाने दिवसभर नवी मुंबई शहराला अक्षरश: झोडपून काढले. नेहमीप्रमाणेच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. सखल भागात पाणी असल्याने वाहने बंद पडण्याच्या घटनादेखील समोर आल्या. जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच, पावसाने जोरदार हजेरी लावत आपली उपस्थिती दाखवली. यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सोबतच वाहतुकीचा वेग मंदावल्याने काही काळ वाहतूक कोंडीही झाली. सोमवारी पडलेल्या पावसामुळे शहरातील ठाणे बेलापूर मार्ग आणि सायन पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार घडले. मागील काही दिवसांपासून शिरवणे नाका ते तुर्भे स्टोअर या ठिकाणी विविध विकासकामे सुरू आहेत. पावसाळा सुरू झाला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम चालू असल्याने वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागला.

चौकट
रिक्षा, एनएमएमटीच्या बसेस बंद पडल्या
सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक जुन्या बसेस रस्त्यावर बंद पडलेल्या होत्या; तर वातानुकूलित बसेसचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रिक्षा बंद पडल्याचे प्रकारदेखील घडले. ठाणे बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलावर रस्त्याच्यालगत खडी आणि मातीचा भराव साचल्याने दुचाकी वाहनचालकांना याचा नाहक त्रास सोसावा लागला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87804 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top