घाटकोपरमध्ये घरावर दरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये घरावर दरड
घाटकोपरमध्ये घरावर दरड

घाटकोपरमध्ये घरावर दरड

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी सातच्या दरम्यान घाटकोपरच्या पंचशीलनगर येथील एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली.
डोंगरावरील मोठी झाडे उन्मळून पडल्याने दरड घरावर कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्यात मदत केली.
पंचशीलनगरातील साई प्रेरणा सोसायटी ग्रुप नंबर ५ येथील घरावर सकाळी दरड कोसळली. बबन घनवट यांचे हे घर असून त्यांनी हे घर संतोष उपाळे यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. संतोष उपाले यांच्यासह चार ते पाच जण या घरात राहतात. पंचशीलनगराजवळील खंडोबा टेकडी येथे दरवर्षी पावसाळ्यात माती खचण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे पंचशील नगर येथे दरड कोसळल्याने चाळीतील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत कोठे ना कोठे दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होत असते. शहरातील कितीतरी डोंगरउतारांवर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा गंभीर आहे. एकीकडे धोकादायक इमारती आणि दुसरीकडे दरड कोसळण्याची भीती असलेले विभाग हे दोन मोठे चिंतेचे विषय आहेत.
...
आज सकाळीच घरावर दरड कोसळून पत्रे आणि भिंत कोसळली. आम्ही इथे पाच जण राहतो. सकाळी मुलीला शाळेत सोडले आणि आम्ही बाहेर होतो त्या वेळेस अचानक काही कोसळल्याचा आवाज आला. यात आमच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. चारही भिंतींना तडे गेले आहेत. पत्रे तुटले आहेत. सध्या शेजारी असलेल्या घरात आम्ही स्थलांतरित झालो आहोत.
- संतोष उपाले, भाडेकरू
...
खंडोबा टेकडी येथे दर वर्षी पावसाळ्यात दुर्घटना घडत असते. सध्या अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे बाकी आहेत. रात्री पाऊस जास्त पडला की रहिवाशांनाच सतर्क राहावे लागते. दरड रात्री कोसळली असती तर जीवितहानी झाली असती.
- अशोक बैरागी, रहिवासी, पंचशीलनगर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87820 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..