मुंबई-गोवा मार्गावर पेण परिसरात खड्डेच खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा मार्गावर पेण परिसरात खड्डेच खड्डे
मुंबई-गोवा मार्गावर पेण परिसरात खड्डेच खड्डे

मुंबई-गोवा मार्गावर पेण परिसरात खड्डेच खड्डे

sakal_logo
By

पेण, ता. ५ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी एकेरी मार्ग तयार करण्यात आला आहे. या रस्‍त्‍यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. वडखळ येथील भलामोठा खड्डा तर अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे जुन्या रस्त्यावरून ग्रामीण भागातील जाणाऱ्या नागरिकसह वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
पेण तालुक्यातील वाशी नाका, उचेडे, वडखळ तर पुढे डोलवी येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. मध्यंतरी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच लगतच्या रस्त्यांवर अपघात होऊन काहींना जीव गमवावे लागले आहे. पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे रस्त्यांची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. ठेकेदाराने पावसाची उघडीप पाहता तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्‍यावे, अशी मागणी शहरातील वाहनधारकही करीत आहे. वडखळ येथील बायपासजवळचा खड्डा इतका खोल आहे, की वाहन पलटी होण्याची शक्‍यता चालकांकडून वर्तविण्यात येत आहे. रस्‍त्‍याची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग तसेच पेण, वडळखमधील अंतर्गत रस्त्यांची येत्या दोन दिवसात पाहणी करण्यात येईल. शिवाय पावसाची उघडीप मिळताच वडखळ पुलाखाली पडलेला खड्डा तसेच इतरही खड्डे लवकरात लवकर भरण्यात येतील
- मधुकर आडे, अभियंता सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87821 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top