अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचे वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचे वारे
अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचे वारे

अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचे वारे

sakal_logo
By

वसई, ता. ५ (बातमीदार) ः मुंबईत ज्याप्रमाणे पावसाळ्यात कांगा लीग क्रिकेट सामने होतात, त्याचप्रमाणे वसई तालुक्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यातील क्रिकेट सामन्यांची रंगत न्यारी असल्याचे दिसून येत आहे. सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी येथे पहावयास मिळत आहे. येणाऱ्या पर्यटकांची पावलेही हे सामने पाहण्यासाठी थबकत आहेत.
या ठिकाणचे कोळी बांधव वर्षातील नऊ महिने जीव मुठीत घेऊन खोल समुद्रात वादळवाऱ्याशी झुंज देऊन मासेमारी करत कुटुबांचा उदरनिर्वाह करतात. घरातील सदस्य दूर असल्याने महिलांवर अधिक जबाबदारी येत असते; परंतु सध्या पावसामुळे मासेमारी बंद असल्याने नागरिक देवदर्शन, फिरणे याचे नियोजन करतात. त्यातच कोळी बांधव क्रिकेटचादेखील तितकाच प्रेमी आहे. त्यामुळे मासेमारी बंदी काळात गावागावात, कोळीवाड्यात क्रिकेटला उधाण आल्याचे दिसते. अशातच समुद्रकिनारी सध्या क्रिकेट सामन्यांचे वारे वाहू लागले आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी केली जात आहे.

असे होतात सामने
सहा/सहा षटकांचे सामने खेळवले जातात. या वेळी अत्यंत चुरस निर्माण होत असते. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते व या वेळी ग्रामस्थ पर्यटक प्रोत्साहन देत असतात.

याच किनारी घडलेले खेळाडू
अर्नाळा किनाऱ्यावरील स्पर्धेत खेळून नेस्टर धम्बा नावाचा खेळाडू आज आखाती देशातील ओमानमध्ये क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. एलन गावद्या दुबईतील एका क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करतोय. समुद्री वाळूत तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला आजचा मुंबईचा रणजी खेळाडू असलेला विनायक भोईर तसेच राज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळळारी प्रियंका भोईर ही याच सामन्‍यांतून घडल्‍याचे अर्नाळा गावातील क्रिकेटप्रेमी अभिमानाने सांगत आहेत.

मासेमारी बंद असल्याने ग्रामस्थ आपला छंद जोपासत आहेत. किनाऱ्यावर विस्तीर्ण जागा असल्याने या ठिकाणी क्रिकेट सामने भरवले जातात. ग्रामस्थ व मुंबई, ठाणे परिसरातून येणारे पर्यटकदेखील याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
– निनाद पाटील, ग्रामस्थ, अर्नाळा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87829 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..