दिलीप चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
दिलीप चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : नेरूळमधील दिलीप चव्हाण यांची नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथील निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती फ्रंटलर सेलचे हिरालाल राठोड, तसेच बंजारा समाजाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबई शहरात पक्षवाढीसाठी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, सरचिटणीस तथा निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे दिलीप चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87830 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top