उद्यानांच्या नावाने पैशांची उधळपट्टी थांबवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यानांच्या नावाने पैशांची उधळपट्टी थांबवावी
उद्यानांच्या नावाने पैशांची उधळपट्टी थांबवावी

उद्यानांच्या नावाने पैशांची उधळपट्टी थांबवावी

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : खारघर वसाहतीत सिडकोकडून उद्यान आणि मैदाने विकसित करण्यात आली आहेत. ती सुस्थितीत असूनही विकासकामाच्या नावाखाली होणारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी; अन्यथा काम बंद पाडण्यात येईल, असे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे पदाधिकारी रामचंद्र देवरे, उत्तम मोर्बेकर, संतोष गुजर, अनिस तेली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

खारघर वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. घंटागाडीतून होणारी कचऱ्याची गळती या महत्त्वाच्या कामांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी खारघर वसाहतीत सुस्थितीत असलेली मैदाने आणि उद्यानांच्या कामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. खारघर सेक्टर दोनमधील उद्यानातील मुलांची खेळणी, सुरक्षा रक्षकाची केबिन, हायमास्ट दिवे, खुली व्यायामशाळा असताना पुन्हा या उद्यानासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. खारघरमधील उद्यान सिडकोकडे असताना योग्य प्रकारे निगा राखली जात असे; मात्र पालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर दुरवस्था झाली आहे. पालिका आयुक्तांनी सदर पाहणी करूनच उद्यान विकसित करावे. पालिकेने दुर्लक्ष केल्यास सुरू असलेले काम बंद करण्यात येईल, असे निवेदन पालिका आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

फलकावर निधीचा उल्लेख टाळला
पालिकेकडून गेल्या वीस दिवसांत खारघरमधील अनेक उद्यान आणि मैदानांचे भूमिपूजन करण्यात आले. सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर विकासकामांकरिता किती पैसे खर्च करण्यात येणार आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87831 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top