कृषी विभागाच्या माध्यमातून जांभिवलीत शेतकरी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विभागाच्या माध्यमातून जांभिवलीत शेतकरी शिबिर
कृषी विभागाच्या माध्यमातून जांभिवलीत शेतकरी शिबिर

कृषी विभागाच्या माध्यमातून जांभिवलीत शेतकरी शिबिर

sakal_logo
By

पनवेल (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामपंचायत जांभिवली येथे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी शिबिर पार पडले. महाडीबीटीअंतर्गत विविध योजनांबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या वेळी बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी, मग्रारोहयो फळबाग लागवड अर्ज भरून कागदपत्रे जमा करण्यात आली. तसेच हळद लागवडीबद्दल मार्गदर्शन, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच पीएम किसान योजना ई- केवायसी ३१ जुलैच्या आत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. माती परीक्षण नमुना घेणे व त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. मौजे जांभिवली गावचे सरपंच रवींद्र कोंडिलकर यांच्या हस्ते बायोला व भाजीपाला मिनिकीटचे वाटप करण्यात आले. या शिबिराला कृषी सहायक दिनेश ढालपे, प्रसाद पाटील, कृषीमित्र दत्तात्रेय कोंडीलकर, लक्ष्मण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87837 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..