मटण, मच्छी विक्रेत्यांना परवाना सक्‍ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटण, मच्छी विक्रेत्यांना परवाना सक्‍ती
मटण, मच्छी विक्रेत्यांना परवाना सक्‍ती

मटण, मच्छी विक्रेत्यांना परवाना सक्‍ती

sakal_logo
By

पनवेल, ता. ५ (प्रतिनिधी)ः शहरातील मटण, चिकन आणि मच्छी विक्री करणाऱ्यांना आता परवाना घेणे बंधनकारक होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे घनकचरा व्यवस्थापन करणे सुलभ होणार असून, पालिकेच्या महसुलात भर पडणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेचे आयोजित बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात करण्यात आले आहे. या वेळी विविध विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार असून, मटण चिकण आणि मच्छी विक्रेत्यांना परवाना घेणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रासह व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मांस, मच्छी विक्रेत्यांची लहान मोठी दुकाने हजारो दुकाने आहेत. या मध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानाची संख्या मोठी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण होते. शहरात जागा मिळेल तेथे कुठेही मांसविक्री होत असल्यामुळे परवाना दिल्‍याने पालिकेच्या वतीने अशा दुकानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येईल आहे. पालिका अधिनियमानुसार, अशा विक्रेत्‍यांनी व्यवसायासाठी लागणारा परवाना घेणे अपेक्षित होते. पालिकेचे परवाना धोरण रखडल्याने मांस, मच्छी विक्रेत्यांना आतापर्यंत परवाने मिळू शकले नव्हते.

नियंत्रण आवश्यक
उघड्यावर मांस, मटण, मच्छी विक्री करणाऱ्यांवर सध्या पनवेल महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. मांस विक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जात असल्‍याने भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे पालिकेने घेतलेल्या परवाना देण्याच्या निर्णयामुळे मांस, मच्छी विक्रेत्यांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल.


प्रस्तावित वार्षिक शुल्क

चिकन - ७५० रु
मटण - १००० रु
बीफ/पोर्क विक्री - १३०० रु
मांस व चिकन एकत्रित विक्री - १७०० रु
मासळी विक्री - २०० रु
मांस, मासळी प्रक्रिया केंद्र - २५,००० रु
मांस, मासळी, पशुधन वाहतूक - १५०० रु प्रति टन

पनवेल महापालिकेने घेतलेल्या परवाना देण्याच्या निर्णयाचा विक्रेत्यांना फायदाच होणार आहे. पालिकेचा परवाना मिळाल्यावर विक्रेत्यांना होणार इतर त्रास निश्चितच कमी होईल.
- वकील शेख, मटण विक्रेता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87840 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top