मैदानांचा व्यावसायिक वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानांचा व्यावसायिक वापर
मैदानांचा व्यावसायिक वापर

मैदानांचा व्यावसायिक वापर

sakal_logo
By

नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी महापालिकेने खासगी शाळा व महाविद्यालयांना मैदाने उपलब्ध करून दिलेली आहे. शाळा व महाविद्यालय यांच्या वेळेव्यतिरिक्त ही मैदाने स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध करून देण्यात यावीत; परंतु अनेक शिक्षण संस्थांनी मैदानांचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. याबाबत मनसेने दिलेल्या पत्राची नवी मुंबई आयुक्तांकडून दखल घेण्यात आली असून कारवाईचे निर्देश दिले आहे.

नवी मुंबईतील शिक्षण संस्था चालकांनी मैदाने बंदिस्त करून स्थानिकांचा अधिकार डावलला आहे. त्यामुळे स्थानिक मुलांकडून मैदानाचा वापर होताना दिसत आहे. अनेक शिक्षण संस्थांनी एका बाजूला काँक्रीटीकरण करून, कृत्रिम गवत लावून मैदाने बंदिस्त केली आहे. तसेच मैदानात अवैधरीत्या फुटबॉलचे टर्फ बनवण्यात आले आहेत. शुल्क आकारून फुटबॉलसाठी हे मैदान दिले जात आहे. अशा प्रकारे यामुळे सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदानी, शाळा महाविद्यालय व खासगी संस्थांकडून आता बळकवण्यात आली आहे. यामुळे मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र पाठवत कारवाईची मागणी केली आहे. बांगर यांनी पत्र पाठवून झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यास सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87853 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top