भागाचे नाव गणेश मंदिर, मंदिर मात्र दुसऱ्याच प्रभागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भागाचे नाव गणेश मंदिर, मंदिर मात्र दुसऱ्याच प्रभागात
भागाचे नाव गणेश मंदिर, मंदिर मात्र दुसऱ्याच प्रभागात

भागाचे नाव गणेश मंदिर, मंदिर मात्र दुसऱ्याच प्रभागात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत प्रभाग क्रमांक ३२ चे नाव गणेश मंदिर जयहिंद कॉलनी असे असताना या प्रभागातील गणेश मंदिर मात्र प्रभाग क्रमांक २९ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. प्रभागातून मंदिर वगळले असताना आमच्या प्रभागाचे नाव गणेश मंदिर का, असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ३२ मधून वगळलेले १ हजार ९४० मतदार प्रभाग क्रमांक २९ मध्ये समाविष्ट केले आहेत, ते मतदार पुन्हा प्रभाग क्रमांक ३२ मध्ये समाविष्ट करण्यात यावे. यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा धात्रक यांनी दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रथमच पॅनेल पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या असून, अंतिम प्रभाग रचनेची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. मनपाने प्रसिद्ध केलेली मतदार यादी पाहून धक्का बसला असल्याचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केली गेलेली आहे. यासंदर्भात १४ फेब्रुवारीला हरकत घेतली होती.
दोन हजार नावे वर्ग
प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक ३२ हा गणेश मंदिर जयहिंद कॉलनी होता. त्यात गणेश मंदिराचा समावेश असल्याने त्याचे नाव गणेश मंदिर होते; मात्र महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून गणेश मंदिर वगळले आहे. गणेश मंदिर जयहिंद कॉलनी प्रभागातील सुमारे २ हजारच्या आसपास मतदारांची नावे मोठागाव ठाकुर्ली प्रभागात वर्ग करण्यात आली आहेत. येथील माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांची नावे त्यांच्या गणेश मंदिर प्रभागात नसून, दुसऱ्या प्रभागास जोडली आहेत. याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्‍यात आ‍ली असून, पालिका अधिकाऱ्यांचीदेखील भेट घेतली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87863 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top