
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई, ता. ६ : पावसासोबत संसर्गजन्य आजारही येतात. यातून नेत्रविकारही जडतात. याच पार्श्वभूमीवर डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. कंजक्टिव्हायटिस (डोळे येणे), रांजणवाडी, कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे संसर्ग आहेत. पावसाळ्यात डोळे लाल होणे, चिकट द्रव बाहेर येणे, डोळ्यांतून पाणी येणे, वेदना होणे, दृष्टी धुसर होत असल्यास नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घेण्याचा सल्लाही दिला जात आहे.
पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, परंतु संसर्गजन्य आजारांपासून सावध राहणेही तितकेच गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाळ्यात डोळ्यांना स्पर्श करू नका, डोळे चोळू नका. हातावर हजारो जीवाणू असतात, जे डोळ्याला संसर्ग करू शकतात, असे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. स्नेही कंकरिया यांनी सांगितले. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे. कारण संसर्गाची जोखीम वाढलेली असते. त्या ऐवजी या कालावधीत चष्मा वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन इतरांना वापरण्यास देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87892 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..