पावसाअभावी पालेभाज्या महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाअभावी पालेभाज्या महाग
पावसाअभावी पालेभाज्या महाग

पावसाअभावी पालेभाज्या महाग

sakal_logo
By

वाशी, ता. ५ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने महिनाभराच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. यात कोथिंबिरीच्या दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अद्यापही जोर न धरल्यामुळे पालेभाज्या महाग झाल्याचे बोलले जात आहे. पालेभाज्या महागल्याने फळभाज्या घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून, त्यामुळे या भाज्या स्वस्त झाल्या आहेत.
मुंबईसह परिसरात जरी पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाने हवा तसा जोर धरला नाही. याचा परिणाम होऊन पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीतील व्यापारी के. डी. मोरे यांनी दिली आहे. घाऊक बाजारात महिनाभरापूर्वी मेथी १४ ते १६ रुपये जुडी होती. ही जुडी आता १८ ते २४ रुपये झाली आहे. कोथिंबिर १६ ते १८ रुपयांवरून २० ते ३० रुपयांपर्यंत गेली आहे. कोबी, गवार, ढोबळी मिरची, घेवडा या फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे; तर फ्लॉवर, भेंडीचे दर जैसे थे आहे. घाऊक बाजारांच्या तुलनेत किरकोळ बाजारामध्ये हेच दर ३० टक्के अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

...तर दर घसरणार
मुंबईतील दमदार पावसामुळे बाजारात मालाची खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण २० ते २५ टक्के कमी झाले आहे. बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून खरेदीदार कमी झाल्याने दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चौकट
टोमॅटोचे दर पूर्वपदावर
टोमॅटोची बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. महिनाभरापूर्वी उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीत घट झाली होती. परिणामी बाजारात टोमॅटोची आवक रोडावली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटोचे दर हे ७० रुपये किलोपर्यंत होते; तर किरकोळ बाजारात हेच दर १०० रुपयांवर गेले होते. आता बंगळुरूमधून टोमॅटो बाजारात येऊ लागल्यामुळे दरात घसरण होऊन प्रतिकिलो २६ ते ३० रुपये दर झाले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो)
भाज्या ५ जुलै ५ जून
कोथिंबिर (जुडी) २० ते ३० १६ ते १८
मेथी १८ ते २४ १४ ते १६
पालक ७ ते ९ ७ ते ८
शेपू १० ते २० ८ ते १४
कोबी १४ ते २० १८ ते २०
गवार ३८ ते ५४ ४० ते ५५
घेवडा ३५ ते ६५ ५० ते ७०
ढोबळी मिरची २६ ते ४० ४० ते ५०
्फ्लॉवर १६ ते २० १८ ते २२
टोमॅटो २६ ते ३० ४० ते ७०
वाटाणा ७० ते ११० ७० ते १००
भेंडी ३० ते ४४ ३० ते ३४

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87895 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top