फसवणूकप्रकरणी दोन सरपंचांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी दोन सरपंचांवर गुन्हा
फसवणूकप्रकरणी दोन सरपंचांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी दोन सरपंचांवर गुन्हा

sakal_logo
By

पनवेल, ता. ५ (वार्ताहर) : ग्रामपंचायतीचे लेटरहेड व शिक्क्यांद्वारे अनेक विकसकांना बांधकाम परवानग्या देत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करणाऱ्या दोघा माजी सरपंचांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीत हा गैरव्यवहार झाला होता. याप्रकरणी तत्कालीन सरपंच विश्वास भगत, प्रमिला भगत या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गैरव्यवहाराबाबत उसर्लीमधील ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑक्टोबर २०१९ मध्ये तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज चौकशीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी धनगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात तत्कालीन सरपंच यांनी २००८ ते २०१४ या कालावधीत विनाठराव परस्पर बांधकाम परवानग्या देत गैरव्यवहार केल्याचे आढळून आले. याबाबतचा अहवाल उपमुख्य कार्यकरी अधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात फौजदारी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामसेवक रेवनाथ ढेरे यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87905 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..