३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

sakal_logo
By

३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

नवी मुंबई पालिकेच्या सोसायट्यांना नोटिसा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ ः मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक अवस्थेतील इमारती पावसाळ्यात कोसळण्याच्या दुर्घटना होतात. ही गंभीर बाब लक्षात घेत ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. नोटिसा मिळाल्यानंतरही स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या सोसायट्यांवर पालिका गुन्हा दाखल करणार आहे.
सिडकोने वसवलेल्या नवी मुंबई शहराला आता ३० वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. या शहराच्या निर्मितीच्या वेळेस तयार झालेल्या इमारतीही आता जुन्या झाल्‍या आहेत. मागील काही वर्षांमध्ये पावसाळ्यात दुर्घटना घडलेल्या इमारती ३० वर्षांपेक्षा जुन्या असल्याचे समोर आले आहे.
नेरूळमधील जिमीपार्क सोसायटीत पाच स्लॅब कोसळलेली इमारतही ३० वर्षे जुनी आहे. या इमारतीलाही महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावली होती. परंतु ते करण्याआधीच इमारतीचा स्लॅब कोसळून एकचा मृत्‍यू तर इमारतींमधील कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे. ही वेळ इतर नागरिकांवर येऊ नये म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने पावले उचलली आहेत.
नगररचना विभागाने ३० वर्षाहून अधिक जुन्या इमारतींच्या स्ट्रक्टरल ऑडिटसाठी यादी तयार करावी. तसेच सिडकोकडून देखील जुन्या इमारतींची माहिती घेऊन ३० वर्षे जुन्या इमारतींचे संबंधित सोसायट्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची प्रक्रिया जलद सुरु करावी, अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. जुन्या इमारतींनी त्यांचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र महापालिकेची नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

दंडात्‍मक कारवाई होणार
स्ट्रक्चरल ऑडिट योग्य रीतीने होण्यामध्ये इमारतींना अडचण येऊ नये याकरिता स्ट्रक्चरल इंजिनिअर यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एखाद्या इमारतीने नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९८ अ नुसार २५ हजार रुपये किंवा संबंधित इमारतीच्या मालमत्ता कराएवढी रक्कम यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87927 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..