
मुंबईत कोरोना चाचण्या वाढवल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : कोविड-सीजनल आजारांची लक्षणे सारखी असल्याने मुंबईत चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोविड चाचणी पॉझिटिव्हिटी मे महिन्यात २.५१ टक्क्यांवरून जूनमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पालिकेने आकडेवारीनुसार, जानेवारीपासून संपूर्ण शहरात नोंदवलेला हा सर्वाधिक टीपीआर आहे. आकडेवारीनुसार मे महिन्यात केवळ ५,८८८ रुग्ण होते, जे जूनमध्ये वाढून ४५,९५१ वर पोहोचले आहेत. वाढवलेल्या कोविड चाचणी आणि हंगामी फ्लूमुळे अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत आहे. चाचण्यांची संख्या मे महिन्यातील २.३४ लाखांवरून जूनमध्ये ३.८० लाखांवर पोहोचली आहे.
दरम्यान, चाचण्या वाढवल्यामुळे पॉझिटिव्हिटी दर वाढलेला दिसत असला, तरी महिनाभरात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांत ४३ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. ३४ दिवसांनंतर शहरात सोमवारी ५०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. ४३१ रुग्णांची नोंद करत आता एकूण संख्या ११,१५,४७३ इतकी वाढली आहे. यापूर्वी ३० मे रोजी ५०० पेक्षा कमी रुग्ण नोंदवले गेले होते तेव्हा ३१८ रुग्ण नोंदले गेले होते.
नियम पाळत नसल्याने वाढ
रुग्णवाढीमागील मुख्य कारण म्हणजे या विषाणूचा संसर्ग वाढतो व पुन्हा कमी होतो. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून, लोक कोविड- १९ चे नियम पाळत नाहीत. यामुळे, विषाणूचा संसर्ग अजूनही होत आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये प्रकरणांच्या संख्येत वाढ पाहत आहोत, असे महाराष्ट्र कोविड -१९ टास्क फोर्समधील वरिष्ठ डॉक्टर म्हणाले. आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांत प्रकरणे कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, हे रुग्ण शहरभर पसरले आहेत की नाहीत, यावर भाष्य करणे फार लवकर होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87933 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..