धामणदेवीजवळ दरड कोसळली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणदेवीजवळ दरड कोसळली!
धामणदेवीजवळ दरड कोसळली!

धामणदेवीजवळ दरड कोसळली!

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला असला तरी कामादरम्यान कटिंग केलेल्या डोंगराचे भाग कोसळू लागले आहेत. तालुक्यातील धामणदेवी गाव हद्दीत डोंगराची कटिंग चुकीच्या पद्धतीने केल्याने संततधार पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन दरड खाली आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे धामणदेवी ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. पोलादपूरजवळील चोळई गावच्या हद्दीत महामार्गाच्या कामादरम्यान डोंगर कटिंग केल्यानंतर उर्वरित डोंगराचा भाग खाली रस्त्यावर कोसळला होता. त्यानंतर ग्रामस्थांचे स्थलांतर देखील करण्यात आले. ही घटना ताजी असताना पुन्हा धामणदेवी हद्दीत डोंगराचा भाग रस्त्यावर कोसळल्याने महामार्गावर आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87954 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top