बेस्टच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू
बेस्टच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

बेस्टच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत स्कुटीस्वाराचा चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री वाशीतील ब्ल्यु डायमंड चौकात घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. सुरेश वाधवा (५७, रा. जुहूगाव-वाशी) असे मृत स्कुटीचालकाचे नाव आहे. सुरेश हे बिर्याणी डिलिव्हरीचे काम करत होते. डिलिव्हरीच्या कामारून परतत असताना, रात्री सव्वाअकराच्या सुमारास कोपरखैरणेहुन वाशीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या बेस्ट बसने सुरेश यांच्या स्कुटीला धडक दिली. यात बसच्या चाकाखाली येऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87956 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..