महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशनचा महिलांना रोजगारासाठी करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशनचा महिलांना रोजगारासाठी करार
महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशनचा महिलांना रोजगारासाठी करार

महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशनचा महिलांना रोजगारासाठी करार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः हार्वर्ड विद्यापीठाने गौरवलेल्या राजस्थानच्या रुमादेवी यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना व्हावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर व श्रीमती रुमादेवी फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारामुळे महाराष्ट्रातल्या महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळेल, त्यांच्याकडे असलेल्या कलाकुसरीला वाव मिळेल आणि त्यांना नवीन प्रकारच्या कलाकृती शिकण्याचे प्रशिक्षण मिळेल व या माध्यमातून त्या स्वावलंबी होऊ शकतील. या उद्देशाने महाराष्ट्र चेंबरने रुमादेवी फाऊंडेशनसोबत हा करार केला आहे, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाऊंडेशनतर्फे राज्यातील महिलांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजकांकरिता उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, राज्य व केंद्र सरकारच्या योजना याविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल, असे महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी सांगितले.
...
रुमादेवी यांनी अल्पशिक्षित असूनही...
महिला कारागिरांना बाजारपेठ मिळविण्याकरिता महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाऊंडेशन प्रयत्नशील राहील, असे श्रीमती रुमादेवी यांनी या वेळी सांगितले. रुमादेवी यांनी अल्पशिक्षित असूनही भारतीय कलाकुसर जोपासताना ३० हजारांहून अधिक महिलांना रोजगार दिला आहे. याप्रसंगी आशीष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, संदीप भंडारी, आशीष गदरे, कविता देशमुख, सागर नागरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87965 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..