रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण
रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण

रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण

sakal_logo
By

घणसोली, ता. ६ (बातमीदार) : सेक्टर सातमधील डी-मार्ट परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून रिक्षाचालक जास्तीचे भाडे आकारत असून मीटर व शेअरिंगच्या रिक्षा उपलब्ध नसतात. या ठिकाणी केवळ थेट भाडे घेण्यास रिक्षाचालक होकार देतात. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचे काम रिक्षाचालक करत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

घणसोली सेक्टर सात येथील डी-मार्टसमोरच रिक्षा स्टॅंड असून रिक्षावाले भाडे नाकारत असल्याने नागरिकांना भर पावसात दुसऱ्या रिक्षाची वाट पाहावी लागते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातील काही रिक्षाचालकांकडे गणवेश, परवाना, रिक्षाचे बॅच देखील नसून हे नियमांचे उल्लंघन करत रिक्षा चालवत आहेत. रेल्वेस्थानकाला जाण्यासाठी शेअर रिक्षाने १० रुपये प्रतिसीट लागतात अथवा मीटरने २५ रुपये होतात. मात्र हे रिक्षाचालक प्रत्येक भाड्याचे ४० रुपये आकारात आहेत. ते भाडे अगदी ८०० मीटरवर असेल तरीही शेअर आणि मीटरने नेण्यासाठी आग्रह केला तर दुसरी रिक्षा बघा, असे मुजोरी उत्तर नागरिकांना देत आहेत. यामुळे अवाढव्य भाडे आकारात असेल तर याठिकाणी रिक्षा स्टॅण्डचा वापर सर्वसामान्यांना लुबाडण्यासाटी केला जात असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.

डी-मार्ट परिसरातील रिक्षावाले शेअर आणि मीटरचे भाडे नाकारतात. अगदी थोडे अंतर जायचे असेल तरीही ४० रुपये देऊन जावे लागते.
- साई चव्हाण

मागील महिन्यामध्ये २५० ते ३०० रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकरच त्या ठिकाणी तपासणी करण्यात येईल.
- हेमांगी पाटील, उप प्रादेशिक अधिकारी, वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87973 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top