तळोजा कारागृहात कार्यकर्त्यांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोजा कारागृहात कार्यकर्त्यांचे उपोषण
तळोजा कारागृहात कार्यकर्त्यांचे उपोषण

तळोजा कारागृहात कार्यकर्त्यांचे उपोषण

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : वैद्यकीय सेवा मिळण्यात होणारा हलगर्जी, तसेच फादर स्टॅन स्वामी यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला आदरांजली म्हणून एल्गार परिषद प्रकरणात सध्या तळोजा तुरुंगात असलेल्या १३ मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ५) एक दिवसीय उपोषण करून निषेध व्यक्त केला.

एल्गार परिषद प्रकरणात अटक व जामिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ८४ वर्षीय स्टॅन स्वामी यांचा ५ जुलै २०२१ रोजी मृत्यू झाला. स्वामी यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतरदेखील कारागृह प्रशासनाची मानसिकता व कैद्यांना सुविधा देण्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, उलट त्यामध्ये दिवसेंदिवस प्रतिकूल वाढ होत आहे. एल्गार परिषद प्रकरणातील १६ आरोपी सध्या तळोजा कारागृहात आहेत. त्यांना योग्य औषधोपचार दिले जात नसल्याचे, तसेच बाह्य सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात नसल्याचे आरोपींनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे. या सर्व अमानवीय धोरणांचा निषेध करण्यासाठी तळोजा कारागृहात एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणी कैदेत असलेल्या १३ आरोपींनी एक दिवसीय उपोषण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87977 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..