
वाडा कॉंग्रेस कार्यालयाला अतिक्रमणाचा विळखा
वाडा, ता. ६ (बातमीदार) ः वाडा शहरातील बाजारपेठेत नगरपंचायत कार्यालयाला लागूनच कॉंग्रेसचे तालुका कार्यालय आहे. या कार्यालयाभोवती टपऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हे कार्यालय झाकोळले असल्याने त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
वाडा तालुका येथे कॉंग्रेसचे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या कार्यालयात माजी खासदार स्व. दामोदर शिंगडा बसत असत आणि येथूनच ते आपला कारभार चालवत असत आणि विशेष म्हणजे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याही पदस्पर्शाने हे कार्यालय पावन झाले आहे. अनेक आजी-माजी पदाधिकारी या कार्यालयात बसून कॉंग्रेसचा कारभार हाकत असत. असे असतानाच या कार्यालयाला अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. आजुबाजूला टपऱ्या-दुकाने थाटली असल्याने त्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
मंगळवारी पालघर कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोईज खान यांनी या कार्यालयाला भेट दिली असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला. त्यांनी लागलीच अतिक्रमण धारकांना बोलावून अतिक्रमण येत्या दहा दिवसांत काढण्याच्या सूचना दिल्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा मोईज शेख यांनी दिला आहे. शेख यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस अदनान धांगे, चिटणीस अनंता वनगा, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश बाराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87991 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..