सराईत मोबाईल चोरट्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत मोबाईल चोरट्यास अटक
सराईत मोबाईल चोरट्यास अटक

सराईत मोबाईल चोरट्यास अटक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः विविध नागरिकांचे आणि कंपन्यांचे तब्बल नऊ महागडे मोबाईल चोरून ते जमिनीत पुरून ठेवणाऱ्या एका सराईत चोराला बोरिवलीतील एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. विजय सना सुरेला असे त्याचे नाव असून पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणून नऊ मोबाईल हस्तगत केले आहेत. गेल्या १९ जून रोजी विकास कुमार राधिकारमन राय यांचा मोबाईल चोरीस गेला होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विजय सना सुरेला याला अटक केली असता अन्य मोबाईलही सापडले. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि पथकाने कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87996 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top