विमानतळाच्या भरावामुळे डुंगी गावात पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळाच्या भरावामुळे डुंगी गावात पाणी
विमानतळाच्या भरावामुळे डुंगी गावात पाणी

विमानतळाच्या भरावामुळे डुंगी गावात पाणी

sakal_logo
By

पनवेल, ता. ६ (प्रतिनिधी) : तालुक्यातील डुंगी गावात पावसाचे पाणी साचून १५ घरांना फटका बसल्याने नऊ नागरिकांचे त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर करावे लागल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे तीन ते चार वर्षांपासून पारगाव डुंगी गावातील घरांत पाणी शिरते.
मौजे पारगाव डुंगी, तसेच बंबावी कोळीवाडा येथे विमानतळाच्या गाभा क्षेत्रासाठी केलेल्या भरावामुळे येथील नागरिकांच्या राहत्या घरांत पाणी जाऊन अतोनात नुकसान होत आहे.
सिडको प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रमोद नाईक यांनी व्यक्त केले. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे डुंगी गावावर ही परिस्थिती ओढवले असल्याचे नागरिक सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88000 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..