
आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
धारावी, ता. ६ (बातमीदार) : लावणी कलावंत महासंघातर्फे भिवंडी ग्रामीण आदिवासी भागातील मोरणी, कुसापूर या गावांत शालेय वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला समाजसेविका ममता अडांगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लावणी कलावंत महासंघाचे सर्व पदाधिकारी, तसेच ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे निर्माता मोहन पवार (मनोरंजन मुंबई), केंद्रप्रमुख नरेश भोईर, ज्येष्ठ समाजसेविका सुषमा शिंदे, तसेच शिक्षक उपस्थित होते. यावेळी नम्रता वेश्वीकर यांनी प्रार्थना घेतली व विशाल सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना विनोद ऐकवून मनोरंजन केले. महासंघाच्या वतीने सरचिटणीस जयेश चाळके, खजिनदार कविता घडशी, संदेश गायकवाड, अनिल हंकारे, प्रीती मोहिते, विद्या सदाफुले, जयश्री सोलकर, सुरेश मोरे, योगेश, भास्कर, स्वप्नील यांनी नियोजन केले. या उपक्रमाला ज्यांनी सहकार्य केले त्यांचे व शिक्षकांचे अध्यक्ष संतोष लिंबोरे यांनी आभार व्यक्त केले.
राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा
मुंबई ः मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता (इयत्ता बारावीपर्यंत) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि खुल्या गटाकरिता ‘हवामान बदल’ हे विषय आहेत. याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. स्पर्धकांनी आपले निबंध जेपीजी किंवा पीडीएफ स्वरूपात officer1.vidnyan@mavipa.org या मेलवर पाठवावेत. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे द्विस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय विजेत्यांसाठीही पारितोषिके हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मुलुंड काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुलुंड (बातमीदार) ः मुलुंडमधील दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे नेते कैलास पाटील यांच्या तर्फे नुकताच आयोजित करण्यात आला. कैलाश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर विद्यार्थ्यांचा गौरव मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. मुलुंड पूर्वेतील मुरंजन शाळेमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम गीते, स्थानिक नेते राजेश इंगळे, डॉक्टर सचिन सिंग, मधुकर म्हात्रे, अमरजित कौर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप
मालाड (बातमीदार) ः ओवायए फाऊडेशन आणि भाकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर, नया नगर येथील १५० गरजू विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आल्या आणि सोबत मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळ/गाणी, धमाल मस्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ओवायए फाऊंडेशनच्या प्रमुख राहीन जुमानी आणि टिम, भाकर फाऊंडेशनचे दीपक सोनावणे, चाऊस शेख इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88001 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..