ठाण्यात वाहतूक कोंडीनंतर अधिकाऱ्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात वाहतूक कोंडीनंतर अधिकाऱ्यांची बैठक
ठाण्यात वाहतूक कोंडीनंतर अधिकाऱ्यांची बैठक

ठाण्यात वाहतूक कोंडीनंतर अधिकाऱ्यांची बैठक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ :
गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली, खारेगाव, आनंद नगर आदींसह इतर भागांत खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरले होते. त्यामुळे पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र, हे रस्ते पीडब्ल्यूडीसह एमएमआरडीएचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी ठाणे महापलिकेच्या नगर अभियंता यांच्या दालनात तातडीची बैठक घेत, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत, खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्याची जबाबदारी आम्ही घेणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट करीत त्या प्राधिकरणांना सक्त ताकीद दिली आहे.
दरवर्षी ठाणे शहरातील रस्त्यांवर पडणारे खड्डे हा चर्चेचा विषय ठरत असतो. ठाणे शहरातील विविध रस्त्यांना खड्डे पडले असून मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली, खारेगाव, आनंद नगर आदींसह इतर भागात खड्डे पडल्याचे चित्र आहे. मंगळवारी खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीनंतर पुन्हा महापालिकेने एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणांची तातडीने बैठक बोलावली. यात ज्या ज्या प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले असतील त्यांनी ते खड्डे तत्काळ बुजवावेत अशी सक्त ताकीद महापालिकेच्या नगरविकास विभागाने दिली.
.......
ाखड्ड्यांवर २.५० कोटींचा खर्च
महापालिका हद्दीत ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील त्याची माहितीदेखील महापालिकेच्या संबंधित विभागाने घेतली असून त्यानुसार पाऊस थोडा कमी झाल्यानंतर तेथील खड्डे भरले जातील, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. त्यासाठी कोल्ड मिक्स व इतर तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून त्यासाठी २.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.
..............
पीडब्ल्यूडीसह एमएमआरडीए, एमएसआरडीए, मेट्रो या सर्व प्राधिकरणांची बैठक घेतली असून खड्डे पडल्यास आपली यंत्रणा तयार ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
- प्रशांत सोनाग्रा, नगरअभियंता, ठामपा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88021 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top