मृतदेह झोळ्यात बांधून अंतयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह झोळ्यात बांधून अंतयात्रा
मृतदेह झोळ्यात बांधून अंतयात्रा

मृतदेह झोळ्यात बांधून अंतयात्रा

sakal_logo
By

रशिद इनामदार ः सकाळ वृत्तसेवा
मानखुर्द, ता. ६ ः भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे त्रास सहन करणे ही मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरवासीयांची प्रत्येक पावसाळ्यातील व्यथा आहे. त्यात मंगळवारी (ता. ५) अंत्ययात्रा नेण्यास मार्ग नसल्याने एका महिलेचा मृतदेह झोळ्यात बांधून नेण्याची वेळ आली. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
शीव-पनवेल महामार्गाकडून महाराष्ट्र नगरात वाहनांची ये-जा करण्यासाठी हार्बर मार्गाखालील भुयारी मार्ग हाच एक पर्याय आहे. त्यात पाणी साचले की नगरवासी तसेच लगतच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पासह म्हाडा वसाहतीचा जवळजवळ संपर्कच तुटतो. पावसाळ्यात एखादी आपत्ती ओढवली तर संबंधित यंत्रणा मदतकार्य कशा करू शकतील, हा प्रश्न त्यांना पडत असतो. मंगळवारी (ता. ५) परिसरातील निधन झालेल्या महिलेची अंत्ययात्रा नेताना तिच्या कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागला. परिसरातीलच एका रहिवाशाने ही व्यथा फेसबुक लाईव्ह करत मांडली होती.
मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या मानखुर्दमधील महाराष्ट्र नगराला पावसाळ्यात दुर्गम भागातील खेड्यासारखे स्वरूप प्राप्त होते. जोराचा पाऊस पडला की हार्बर मार्गाखालील भुयारी मार्गात पाणी साचते व रहिवाशांच्या त्रासाला सुरुवात होते. परिसरातील वाहने रुळांच्या एका बाजूला तर कामानिमित्त बाहेर गेलेल्या रहिवाशांची वाहने दुसऱ्या बाजूला उभी करून धोकादायकरीत्या रेल्वे रूळ ओलांडत पायपीट करावी लागते. दुसरा मार्ग ट्रॉम्बेकडून आहे; परंतु चिता कॅम्पमधून अरुंद रस्त्याने वळसा घालून जावे लागते. त्यामुळे त्या दिशेला वाहतूक कोंडीचा सामना तसेच इंधन अधिक जाळावे लागते.
...
दीड लाख जीव धोक्यात
दीड लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या या परिसरात भर पावसात एखादी आपत्ती ओढवली तर रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या दलांना पोहोचणे अवघड होऊन बसेल. अशा वेळी मोठी जीवितहानी होईल, अशी भीती कित्येकांना वाटत असते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88039 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top