भाड्याच्‍या खोलीत बेकायदा शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाड्याच्‍या खोलीत बेकायदा शाळा
भाड्याच्‍या खोलीत बेकायदा शाळा

भाड्याच्‍या खोलीत बेकायदा शाळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : दिवा येथे सरकारची कोणतीही परवानगी न घेता एका भाड्याच्या खोलीत बेकायदा शाळा सुरू करण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमाची ही शाळा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्यानंतरही शिक्षणाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केला आहे.
दिव्यातील गणेश मंदिरजवळ साबेगाव येथे होली एंजेल इंग्‍लिश स्‍कूल आणि एस. एस. मेमोरियल इंग्लिश स्‍कूल या शाळा २०२२ च्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या शाळा सुरू करण्यासाठी सरकारची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच वर्ग भरवण्यासाठी बेकायदेशीरपणे बांधकाम झालेल्या खोल्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. सध्या या शाळेमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात ही शाळाच बेकायदा असल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष वेधत रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्याला दहा दिवस उलटले तरी कारवाई झालेली नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88044 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..