कोपरखैरणेत सिलिंडरच्या स्फोटात महिला जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेत सिलिंडरच्या स्फोटात महिला जखमी
कोपरखैरणेत सिलिंडरच्या स्फोटात महिला जखमी

कोपरखैरणेत सिलिंडरच्या स्फोटात महिला जखमी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गळती होऊन झालेल्या स्फोटात महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर-१ मध्ये घडली. या दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत घरातील किचनचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर भाजलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. वैशाली भिसे (४०) असे या महिलेचे नाव आहे. भिसे या सेक्टर-१ मधील एसएस-२ टाईप ६६१ क्रमांकाच्या घरामध्ये भाड्याने राहतात. सकाळी किचनमध्ये जेवण बनवत असताना हा प्रकार घडला. भिसे यांची प्रकृती स्थिर असून, दुर्घटनेत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन अधिकारी विवेक म्हात्रे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88061 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..