बेवारस वाहने भंगारात जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहने भंगारात जाणार
बेवारस वाहने भंगारात जाणार

बेवारस वाहने भंगारात जाणार

sakal_logo
By

पनवेल, ता. ६ (बातमीदार) : शहरात ठिकठिकाणी बेवारस वाहने उभी दिसतात. वाहन एकाच जागेवर अनेक दिवस उभे राहिल्‍याने सफाई कामगारांच्या कामातही अडथळा येत असल्‍याने परिसर अस्‍वच्छ होते. महापालिकेने बेवारस वाहने उचलण्याचा निर्णय घेतला असून त्‍यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. ठरवून दिलेले पैसे भरून मालकाने ४५ दिवसांत वाहन परत न नेल्‍यास त्याची भंगारात विक्री करण्यात येणार आहे.
पनवेल महापालिकेची शेवटची महासभा बुधवार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार झाली. महापालिकेच्या विद्यमान सदस्यांच्या मुदत ८ जुलै रोजी संपत असल्याने सभेपुढे असलेले प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्याचे दोन्ही बाजूंनी ठरवण्यात आले होते.
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधून समावेशनास पात्र असलेल्या मात्र समावेशन न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये किमान वेतनाच्या सापेक्ष वेतनवाढ जानेवारी २०२२ पासून देण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग ‘क’कामोठेचे प्रभाग कार्यालय बांधण्याच्या विषयावर माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची वाद-विवाद सोडले तर सभा शांततेने पार पडली. महासभेला सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पत्नी अर्चना ठाकूर या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होत्या.

सभेत झालेले निर्णय
- महापालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक शौचालयांची निगा, दुरुस्ती व नूतनीकरण करणे
- खारघर, कामोठे, नवीन पनवेल, काळुंदेमधील रस्ते दुरुस्‍ती, गटारांवर झाकणे लावणे
- मटण, चिकन, मच्छी आदी मांसविक्री, प्रक्रिया दुकानांची नोंदणी व परवाना शुल्क आकारणी
- ग्रामपंचायतीतील समावेश झालेल्‍या कर्मचाऱ्यांचे वेतनात वाढ
- यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविणे
- सार्वजनिक रस्त्यांची आखणी, सीमांकन करून हस्तांतर करून विकास करणे
- आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे साहित्यासह स्वच्छता व रखवाली करण्यासाठी ई-निविदा - मागवणे व खर्चास मान्यता


पनवेल महापालिका क्षेत्रात सिडकोने विकसित केलेल्या नवीन पनवेल, काळुंद्रे, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा फेज नोडमधील पारंपरिक पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिवे लावणे व त्‍याची पाच वर्षांसाठी परिचालन, देखभाल-दुरुस्ती, सुधारण व नूतनीकरण करणे. याशिवाय शहरातील सिग्नल व्यवस्थेची दोन वर्ष कालावधीकरिता साहित्यांचा पुरवठा करून दैनंदिन परिचालन, देखभाल, दुरुस्ती, सुधारण व नूतनीकरण करणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88065 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..