माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा
माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा

माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

किरण कारंडे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : मुंबईतील माहुल पम्पिंग स्टेशनच्या भूसंपादनासाठीचे मुंबई महापालिकेचे पत्र गेल्या सहा वर्षांपासून मिठागर आयुक्तांकडे धूळ खात पडले होते. याबाबतचा कोणताच निर्णय आयुक्तांकडून झाला नव्हता. महापालिकेने एम पूर्व वॉर्डात नव्या जागेचा शोध घेण्याची माहिती मिळताच मिठागर आयुक्तांनीही सकारात्मक पत्र पाठवून होकार दर्शवला आहे. पण दरम्यानच्या काळात सहा वर्षांचा कालावधी लोटल्याने महापालिकेवर रेडी रेकनरनुसार अधिकचे पैसे मोजण्याची वेळ येणार आहे. 
महापालिकेने सायन गांधी मार्केट, अॅंटॉप हिल, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील पाणी साचण्याच्या समस्या सोडवण्यासाठी माहुल पम्पिंग स्टेशनचा प्रकल्प अमलात आणण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला होता. त्यासाठी केंद्राच्या मिठागर आयुक्त विभागाकडे पाठपुरावाही केला. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे एफ दक्षिण विभागात जागेचा शोध सुरू केला होता. पण पालिकेचा जागेचा शोध सुरू झाल्याची माहिती मिळताच गेल्या वर्षी मिठागर आयुक्तालयाने मुंबई महानगर पालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच महापालिकेने वाणिज्य सचिवांना पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहा एकर मिठागर आयुक्तांच्या अखत्यारितील जमीन महापालिकेला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 
...
मोठा दिलासा मिळेल
सध्या मुंबईत साचणाऱ्या पाण्याचा उपसा पंप लावून केला जातो. मिठागराची जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारणी करून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल. त्यामुळे सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी यांसारख्या भागांना मोठा दिलासा मिळू शकेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88067 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..