कारवाईची वेळ येऊ देऊ नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाईची वेळ येऊ देऊ नका!
कारवाईची वेळ येऊ देऊ नका!

कारवाईची वेळ येऊ देऊ नका!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ६ : ठाणे-पालघर जिल्ह्यातील गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी ९०० खाटांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ५२७ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. असे असताना रुग्णालयाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कान टोचले. येत्या १५ दिवसात तांत्रिक बाबींची पूर्तता करून कामास सुरुवात करावी. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा देखील त्यांनी संबंधिताना दिला.
ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण झपाट्याने होत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. गंभीर आजारांवर रुग्णांना उपचार मिळत नाही आणि रुग्णांची दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव सुरू होते. या सर्व घटना टाळण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाचे रुपडे पालटले जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटीमध्ये करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यावेळी रुग्णालय उभारण्यासाठी सरकारने ३१४ कोटींचा निधी दिला. त्यानंतर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याला सरकारने परवानगी देत ५७४ खाटांचे रुग्णालय बांधण्याचे ठरले होते.
भविष्यातील नागरीकरणाचा विचार करता खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त असल्याने रुग्णालय प्रशासनाने वास्तू उभी रहाण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० केली. त्यानुसार नवा प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यासाठी ५२७ कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली. परंतु या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

एक महिन्यात सुरुवात होणार!
रुग्णालयाच्या कामातील तांत्रिक बाबींची पूर्तता करून निविदा प्रक्रियेची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. या इशाऱ्यामुळे प्रत्यक्ष कामाला एक ते दीड महिन्यात सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88081 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..