
रविवारी आणखी ४ आषाढी विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई. ता. ६ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने राज्यभरात पंढरपूर विशेष रेल्वे गाड्यांच्या शंभर फेऱ्या चालविण्यात येत आहे. मात्र, रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पंढरपूर ते मिरज दरम्यान चार अतिरिक्त एकादशी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहीनुसार, ट्रेन क्रमांक ०११४७ विशेष गाडी पंढरपूर येथून रविवारी दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी ४.५० वाजता पोहोचेल; तर ट्रेन क्रमांक ०११४८ विशेष गाडी रविवारी मिरज येथून संध्याकाळी ६.१५ वाजता सटून पंढरपूरला रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११४९ विशेष पंढरपूर येथून रविवारी संध्याकाळी ४ वाजता सुटून मिरज येथे त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५० विशेष गाडी मिरज येथून संध्याकाळी ६.४५ वाजता सुटून पंढरपूर येथे त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता पोहोचेल. या आषाढी विशेष गाड्या सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सुलगरे आणि आरग या ठिकाणी थांबणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88091 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..