शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यानीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यानीची आत्महत्या
शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यानीची आत्महत्या

शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यानीची आत्महत्या

sakal_logo
By

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद कुडाचा पाडा येथील १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी दुपारी १२ ते ३ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप गीते करत असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर कळू शकेल, असे प्रदीप गीते यांनी सांगितले. यापूर्वीही या शासकीय आश्रमशाळेत अशा घटना घडल्या आहेत. २०१६ मध्ये या आश्रमशाळेत विद्यार्थिनीला ताप येऊन मृत्यू झाला होता, तर अनेक वेळा सर्पदंश व इतर घटना या आश्रमशाळेत घडल्या आहेत. ही आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असून, या आश्रमशाळेकडे आदिवासी विकास प्रकल्पाकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88102 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..